सीधे मुख्य सामग्री पर जाएं
जर मोबाईल गरम होत असेल तर हे करा mobile hitting problem tips in marathi
जर मोबाईल गरम होत असेल तर हे उपाय करा.
नवीन डिजिटल जगात स्मार्टफोन चा वापर आणि वेग वाढला आणि कमी वेळेत चार्जिंग होणाऱ्या मोठ्या आकाराच्या बॅटरी यामुळे मोबाईल वापरकर्त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे, यातील महत्वाचा त्रास म्हणजे मोबाईल गरम होने होय . आणि मोबाईल मधील नवीन नवीन बदल यामुळे मोबाईल गरम होणे हि गोष्ट सामान्य झाली आहे.,पण स्मार्टफोन वारंवार गरम होणे हे धोक्याचे आहे. स्मार्टफोन हा चार्जिंग चालू असताना वापरणे ,विडिओ गेम्स, आणि मोठया प्रमाणात आनावश्यक अँप्स चा वापर करणे यामुळे मोबाईल गरम होण्याच्या समस्या वाढल्या आहेत.
काही स्मार्टफोन हे त्यांच्या तांत्रिक कारणामुळे गरम होतात ,पण आपण 'talk4news' च्या माध्यमाने खलील काही उपायाने' स्मार्टफोनला जास्त गरम होण्यापासून "ओव्हर हिटिंग" पासून वाचवू शकतात.
1)मोबाईलचे कव्हर काढून घ्या: जर मोबाईल जास्त काळ कव्हर मध्ये असेल तर कव्हर काढून घ्या ,यामुळे उंष्णता(heat) बाहेर निघण्यास मदत होते. चार्जिंग आणि मोबाईल अति वापराच्या वेळ मोबाईलीचे कव्हर काढून घ्या. त्यामुळे heat बाहेर निघण्यास मदत होईल.
2)चार्जिंगच्या दरम्यान मोबाईल हा कठीण(hard) पृष्ठभागेवर(जागेवर) ठेवा. म्हणजे टेबल,सोफा,ई. ठेवा त्यामुळे मोबाईल जर गरम होत असेल तर ती उष्णता(heat) निघून जाते, तसे गुळगुळीत जागेवर होत नाही. हे पण वाचा : असा शोधा हरवलेला मोबाइलला find lost mobile by google in marathi
3)रात्रभर मोबाईल चार्जिंगसाठी ठेवू नका: यामुळे आपल्या मोबाईलची चार्जिंग कींवा पॉवर धरून ठेवण्याची क्षमता कमी होते , आणि मोबाइल गरमही होतो.
4)अनावश्यक अँप्स पासून मोबाईल जपा: सहसा मोबाईल गरम होण्यामागे अँप्स या कारणीभूत असतात , काही अँप्स ह्या मोबाईलची जास्त बॅटरी खेचतात आणि बॅकग्राऊंड मध्ये चालू असतात यामुळे मोबाईल गरम होण्याची संभावना जास्त असते त्यामुळे अनावश्यक अँप्स गरजेच्या नसतील तर uninstall किंवा डिलिट करावे.
5)सूर्यप्रकाशपासून मोबाईलला वाचवा: मोबाईल थंड ठेवण्यासाठी उन्हापासून वाचवा, जास्त उन्हामुळे मोबाईलच्या डिस्प्ले वरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
6)अन्य मोबाइलच्या बॅटरी किंवा charger वापरण्याचे टाळा: कंपनीने दिलेली बॅटरी आणि charger हेच वापरा , यामुळे आपला मोबाईल ही गरम होणार नाही आणि चार्जिंग होण्यासाठी जास्त वेळ ही लागणार नाही. वरील सर्व गोष्टी जर आपण पाळल्या तर मोठ्या प्रमाणात आपण आपला स्मार्टफोन गरम होण्यापासून वाचवू शकतो . team@ talk4news.blogspot.com
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें